Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले.. नगरपरिषद,नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर;...

मोठी बातमी.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले.. नगरपरिषद,नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; २ डिसेंबरला मतदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अखेर पडघम वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे आज,मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.त्यानुसार, आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल.राज्यात १४७ नगरपंचायती असून त्यापैकी ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूका होत आहेत. नगरपंचायतीत एका प्रभागात दोन जागा असतात.एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार प्रभागात अर्ज दाखल करता येतील.उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे.उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.जर एखाद्याने जातवैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती जोडावी लागेल.मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. मतदान केंद्रातील इमारतीत मोबाईल नेता येईल परंतु मुख्य कक्षात मोबाईल नेता येणार नाही.
  • निवडणूक कार्यक्रम👇
उमेदवारी अर्ज दाखल करणे -१० नोव्हेंबर २०२५
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत-१७
 नोव्हेंबर २०२५
उमेदवारी अर्जाची पडताळणी-१८ नोव्हेंबर २०२५
 अर्ज मागे घेण्याची तारीख-२१ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे-२६ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस-२ डिसेंबर २०२५
मतमोजणी-३ डिसेंबर २०२५
निकाल घोषित– १० डिसेंबर २०२५
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!