Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी....दोन नक्षली महिलांसह एका समर्थकास जंगलातून गडचिरोली पोलिसांनी केली अटक -आतापर्यंत गडचिरोली...

मोठी बातमी….दोन नक्षली महिलांसह एका समर्थकास जंगलातून गडचिरोली पोलिसांनी केली अटक -आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ७७ नक्षल्यांना केली अटक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षल महिलांसह एका नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे.या तिघांवर महाराष्ट्र शासनाने साडेपाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.काजल उर्फ सिंधू गावडे वय २८ वर्षे, रा.कचलेर,ता.एटापल्ली,गीता उर्फ सुकली कोरचा वय ३१ वर्षे,रा.रामनटोला,ता.एटापल्ली अशी अटकेतील नक्षलींची,तर पिसा पांडू नरोटे रा.झारेवाडा, ता. एटापल्ली असे नक्षल समर्थकाचे नाव आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना हिंसक कारवाया करण्याची योजना नक्षलवादी आखत आहेत.त्यामुळे पोलिस ठिकठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवीत आहेत.असेच अभियान राबवीत असताना सी-६० पथक,पिपली बुर्गी येथील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी काजल आणि गीता यांना जवेली येथील जंगलातून अटक केली.पिसा नरोटे या नक्षल समर्थकास गिलनगुडा जंगलातून अटक करण्यात आली आहे.काजल आणि गीता यांच्यावर प्रत्येकी २ लाख,तर पिसा नरोटेवर दीड लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

काजल गावडे ही २०१२ मध्ये नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक ५५ ची सदस्य झाली. २०१९ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. पुढे २०२० पर्यंत ती कंपनी क्रमांक ४ मध्ये सक्रीय होती.त्यानंतर ती स्टॉफ टीम व प्रेस टीमची विभागीय सदस्य म्हणून कार्यरत होती. २०१९ मध्ये नरकसा, दराची व बोधीनटोला येथील चकमकी, २०२० मधील किसनेली, २०२१ मधील फुलकोडो, खोब्रामेंढा आणि मोरचूल येथील चकमकीत तिचा सहभाग होता.शिवाय २०१९ मध्ये कनेली आणि पुसेर जंगलात स्फोटके दडवून ठेवण्यातही ती प्रत्यक्ष सहभागी होती.

गीता कोरचा ही २०१८ मध्ये भामरागड दलमची सदस्य झाली.त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये अबुझमाड एरियात तिची बदली करण्यात आली.२०१९ मध्ये मोरोमेट्टा-नेलगुंडा, २०२० मध्ये कोपर्शी-पोयारकोठी आणि २०२१ मध्ये कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत ती सहभागी होती.२०२० मध्ये कोठी येथे पोलिस जवान आणि २०२१ मध्ये कोठी-भामरागड मार्गावर एका नागरिकाच्या हत्येत तिचा सहभाग होता.

अटकेतील तिसरा नक्षल समर्थक पिसा नरोटे हा २०१८ पासून नक्षल्यांना वेगवेगळ्या कामात सहकार्य करायचा.२०२१ मध्ये तो जनमिलिशिया कमांडर झाला.२०२२ मध्ये झारेवाडा आणि गोरगुट्टा येथील इसमांच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.तसेच २०२३ मध्ये टिटोडा येथील पोलिस पाटलाचा खून करण्यातही तो सहभागी होता.शिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान टिटोडा येथे स्फोटके पुरवून ठेवण्यात त्याचा सहभाग होता; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ७७ नक्षल्यांना अटक केली आहे.पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पालिस अधीक्षक यतीश देशमुख,कुमार चिंता,एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय राखीव दलाचे सहायक कमांडंट मोहितकुमार, दीपक दास,पिपली बुर्गी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते,गट्टा जांभिया पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी आदींनी ही कारवाई केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!