Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी…नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार…

मोठी बातमी…नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात होती.या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू होती. या कारवाईत आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच या चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात आज सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू होती या चकमकेमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र मध्ये आगामी काळात लोकसभा निवडणुका होत आहेत.या निवडणुका राज्यात पाच टप्प्यात होणार असून यामध्ये १९ एप्रिल,२६ एप्रिल,७ मे,१३ मे आणि२० मे असे पाच दिवशी मतदान होणार आहे.या मतदानाच्या दिवशी किंवा दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क झाली होती.या सुरक्षा यंत्रणेला आता मोठे यश मिळाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!