Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीदिवसभर आराम करायचा आणि रात्रभर नदीचे पात्र पोखरायचे…

दिवसभर आराम करायचा आणि रात्रभर नदीचे पात्र पोखरायचे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभा निवडणुका होत असल्याने तालुका महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त आहे. याचा फायदा घेत रेती चोरटे हे अधिकच सक्रिय झाले आहेत. देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा तसेच इतर तालुक्यातील विविध नदी घाटातून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रात्रभर रेतीची चोरी करून विक्री केली जात आहे.

अनेक नदी घाटांतून रेती चोरीचा सिलसिला रात्री सुरू असतो.गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.त्यामुळे रेती चोरीने गती पकडली आहे.गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.शिवाय नदी नाल्यात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची दुरुस्ती करण्यासाठी रेती उपशाची परवानगी देण्यात येत होती.ती परवानगी देणेही सध्या बंद आहे.असे असतानाही चोरीच्या रेतीवर अनेक बांधकामे सुरू आहेत.सदर बांधकामे विना रॉयल्टी चोरीच्या रेतीवर सुरू असून ट्रॅक्टरद्वारे रेती चोरांची टोळी सर्वत्र सक्रिय झाली असून रेती चोरट्यांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे.प्रशासनाच्या निवडणुकीतील व्यस्ततेमुळे रेती चोरीला जोम आला आहे.चोरीच्या रेतीवर अनेक बांधकामे सुरू आहेत.रेती चोरी सापडू नये यासाठी तस्कर नेहमी सतर्क असतात.दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवली जात आहे.दिवसभर आराम करायचा आणि रात्रभर नदीचे पात्र पोखरायचे असा गोरखधंदा रेती तस्करांकडून सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!