Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीमालवाहू ट्रकच्या धडकेत गडचिरोलीचे तिघे जागीच ठार; आज दुपारच्या घटनेने सर्वत्र हळहळ..

मालवाहू ट्रकच्या धडकेत गडचिरोलीचे तिघे जागीच ठार; आज दुपारच्या घटनेने सर्वत्र हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील चामोर्शी शहरात भीषण अपघात घडल्याची घटना आज,रविवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर घडली. चौघेजण असलेल्या कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला.अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे चकनाचुर झाली.अपघातात विनोद पुंजाराम काटवे वय ४५ वर्षे, राजू सदाशिव नैताम वय ४५ वर्षे व सुनील वैरागडे वय ५५ वर्षे या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेही  गडचिरोली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर,अनिल मारोती सातपुते वय ५० वर्षे हे गंभीर जखमी झाले असून,त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
माहितीनुसार,विनोद,राजू,सुनील व अनिल हे चौघेही आज रविवारी काही कामानिमित्त चामोर्शी शहरातून कार क्रमांक-एमएच ३३ ए ०८२५ ने आष्टीकडे जात होते.कारने जात असतांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर चालकाने अचानक वळण घेतला असता मागेहून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली.धडक बसताच कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला.घटना घडताच ट्रक चालक ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाला.पोलिसांना अपघात संदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांकडून सध्या मालवाहू ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत.घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!