Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीमार्कंडा यात्रेत 'सखी वन स्टॉप सेंटर' योजनेची जनजागृती- 'सखी वन स्टॉप सेंटर'...

मार्कंडा यात्रेत ‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेची जनजागृती- ‘सखी वन स्टॉप सेंटर’ पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा,सुविधा पुरविणारी योजना…- पीडीत महिला आढळल्यास १८१,१०९८ संपर्क साधण्याचे आवाहन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोलीच्या वतीने विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव यात्रेदरम्यान जनजागृतीपर स्टॉल लावून सखी वन स्टॉप सेंटरची जनजागृती करण्यात आली.गडचिरोली मार्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त सात दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.येथील पुरातन शिवलींगाचे दर्शन घेण्याकीरता हजारो भाविक येत असतात.या निमित्ताने सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोलीच्या वतीने “एका छताखाली अनेक सेवा” देणाऱ्या महिलांसाठी तत्पर वन स्टॉप सेंटर या योजनेचे दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत माहितीपर तथा जनजागृतीपर स्टॉल लावून जनजागृती करण्यात आली.केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी वन स्टॉप सेंटर ही एक पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा,सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन,कायदेशीर,पोलीस व निवास अशा सेवा,सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे.सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृतीची कमी आहे.आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक,कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा; याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.जनजागृतीच्या अनुषंगाने सखी वन स्टॉप सेंटर स्टॉल अंतर्गत विविध महिला व नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली.आपल्या परिसरातील जवळपास पीडीत महिला आढळल्यास १८१,१०९८ तथा जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरला संपर्क करण्याचे आवहन करण्यात आले.त्याप्रमाणे सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशी पीडीत महिला आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटरला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.सखी वन स्टॉप सेंटरच्या दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ या तीन दिवसीय मार्कंडा येथील जनजागृतीपर स्टॉल,कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक तथा इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले असल्याचे असे केंद्र प्रशासक केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!