उद्रेक न्युज वृत्त :-भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त कारकीर्द औरंगाबादमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.ते म्हणाले की,महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले.चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत.
सावित्री बाईंचे लग्न १० व्या वर्षी झाले,तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे १३ वर्ष होते.कल्पना करा,की मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते.मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.मात्र,गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलेच जाणार नाही.