Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीमहिला व मुलींना सखी वन स्टॉप सेंटरने दिला मदतीचा हात- संकटग्रस्त,पीडीत मुली...

महिला व मुलींना सखी वन स्टॉप सेंटरने दिला मदतीचा हात- संकटग्रस्त,पीडीत मुली व महिलांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे सखी ‘वन स्टॉप सेंटर’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर,गडचिरोली द्वारा आतापर्यंत १८८ संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे. 

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची,भोजन,चहा,नाश्ताची सुविधा आहे.किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन,न्यायालयीन व पोलीस विषयक मदत, वैद्यकीय मदत अशा अनेक सेवा एका छताखाली देवून कौटूंबिक हिंसाचार,तनाव यासारख्या प्रकरणांचा या सेंटरद्वारा निपटारा करुन त्यांचे कुटूंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

ज्या महिलांना व मुलींना पुनर्वसनाची गरज आहे; अशांना वन स्टॉप सेंटर द्वारा पुनर्वसीत करण्यात येते. विविध हिंसाचारातील पीडीत मुली व महिला ह्या कधी स्वत:,आई-वडीलांकर्वी तर कधी पोलीस यंत्रणेद्वारा सखी वन स्टॉप सेंटरला दाखल होतात.अशा महिला व मुलींना त्या-त्या संदर्भांत आवश्यक समुपदेशन तथा सहाय्य करुन त्यांना पुढील जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.

कुमारी मातांची प्रसुती,नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन तथा बहूमुल्य समुपदेशन, पीडीतांना नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन,पीडीत मुलांना शाळेत व बाल सुधारगृहात दाखल करणे,मनोरुग्न महिलांचे उपचारार्थ मदत व पुनर्वसन,घरगुती  हिंसाचार व मतभेद असणाऱ्या पिडीत महिलांना समुपदेशन,कौटुंबिक समुपदेशन व पुनर्वसन अशा अनेक जबाबदाऱ्या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातुन पार पाडल्या गेल्या.

जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनात एका छताखाली अनेक सुविधा सर्व संकटग्रस्त महिलांना उपलब्ध असल्याची माहिती सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी दिली आहे.

संकटग्रस्त,पीडीत मुली व महिलांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे सखी वन स्टॉप सेंटरच्या जनजागृती पर कार्यक्रमाच्या माध्यमातून घर,परिवार,समाज, नातेवाईक व अन्य प्रकारे दु:खी महिलांनी सखी वन स्टॉप सेंटर शी संपर्क करावा व मदत घ्यावी; असे आवाहन केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार तथा इतर सर्व कर्मचारी वर्गाने केले आहे.

संपर्क कुठे करावा? 👇

हेल्पलाईन क्रमांक :- 181

कार्यालय :- 07132-295675

केंद्र प्रशासक :- 9637976915

पत्ता :- जुनी धर्मशाळा इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर,मुल रोड,कॉम्प्लेक्स,गडचिरोली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!