Tuesday, June 16, 2026
Homeमुंबईमहिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राची वर्ल्ड चॅम्पियन ठरली दिव्या देशमुख.. -मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस...

महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राची वर्ल्ड चॅम्पियन ठरली दिव्या देशमुख.. -मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे.विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रँण्ड मास्टर..विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटलावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे.या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्या वतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.तसेच त्यांनी उपविजेत्या ग्रँण्ड मास्टर कोनेरू हम्पी यांचेही अभिनंदन केले आहे.
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटलावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती,हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे.महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत.यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँडमास्टर ठरल्या आहेत.आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधीत्व करत ३५ वेळा पदक पटकाविले आहे.यात तब्बल २३ सुवर्ण,७ रौप्य आणि ५ ब्राँन्झ पदकांचा समावेश आहे.बुद्धिबळाच्या विश्वविजेते पदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली,हे देखील विशेष मानावे लागेल.बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्वाचीच अशी आहे.दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली या तोडीस तोड होत्या.या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे.यातून भारताला आणखी एक ग्रँण्डमास्टर बुद्धिबळपटू मिळाली आहे. तीही महाराष्ट्रातून हे विशेष.या दोघींचे यश हे भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार आहे.हे यश भारताच्या क्रीडा लौकीकात भर घालणारे आहे.या यशासाठी दिव्या आणि कोनेरु यांचे मनापासून अभिनंदन.ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांची विश्वविजेती कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी असा क्षण आहे.या विश्वविजयी कामगिरीसाठी ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे मनापासून अभिनंदन.त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी मेहनत घेणाऱे प्रशिक्षक,मार्गदर्शक तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचे मनापासून अभिनंदन..ग्रँण्डमास्टर दिव्या यांच्याकडून यापुढे कॅँण्डिडेटस् स्पर्धेतही असाच विजय साकारला जाईल, असा विश्वास आहे.त्याकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.विशेष म्हणजे,१९ वर्षीय दिव्या देशमुख ही नागपूर येथील रहिवासी आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!