Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीमहिलांच्या संरक्षणासाठी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य... - अन्यथा...

महिलांच्या संरक्षणासाठी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य… – अन्यथा ५० हजार रुपये दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने सन २०१३ मध्ये “महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम” लागू केला आहे.या अधिनियमाच्या तरतुदीनुसार त्या-त्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,अशासकीय कार्यालये,दुकाने,वैद्यकीय सेवा देणारी केंद्रे,महामंडळे,कंपन्या,उद्योगधंदे,औद्योगिक स्थळे,करमणुकीची ठिकाणे,शैक्षणिक संस्था,संघटना तसेच खाजगी कार्यालये अशा ज्या आस्थापनांमध्ये किमान १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत,अशा प्रत्येक ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक असून सर्व संबंधित आस्थापनांनी ही समिती स्थापन करणे आवश्यक आहे.
अधिनियमातील कलम २६ नुसार संबंधित मालकाने तक्रार समिती स्थापन केली नाही किंवा कलम १३,१४ व २२ नुसार कार्यवाही केली नाही,तर त्याला ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड किंवा आस्थापनेचा परवाना रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे आहे.तसेच समितीची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकाच्या स्वरूपात लावणे आवश्यक आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून त्याची नोंदणी SHE BOX पोर्टल वर करणे आवश्यक आहे.याचबरोबर समितीचे वार्षिक अहवाल, कायद्याच्या प्रचारप्रसारासाठी घेतलेले कार्यक्रमांची माहिती देखील पोर्टलवर अद्ययावत करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.अधिक माहिती करिता जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!