Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीमहाराष्ट्र सरकारला ग्रंथालयाचे महत्व कळणार केव्हा? - राजकारणी मंत्र्यांना शाळा,वाचनालये नकोत..! -...

महाराष्ट्र सरकारला ग्रंथालयाचे महत्व कळणार केव्हा? – राजकारणी मंत्र्यांना शाळा,वाचनालये नकोत..! – नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे यांची खोचक टीका…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मिसाईल मॅन,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.वाचन चळवळ रुजविण्यासाठी,खरं तर परिवर्तनाच्या वाटेवर येण्यासाठी हा क्रांती दिवस ठरेल.महाराष्ट्र सरकारला ग्रंथालयाचे महत्त्व कळलेच नाही आणि सर्व सामान्य माणसाला मोठे होऊ द्यायचे नाही,शिकूही द्यायचे  नाही.ज्ञानदाणाचे दरवाजा उघडणारे ग्रंथालय कर्मचारी यांची क्रूर चेष्टा सरकार करतोय.ग्रंथालयात काम करणारे कर्मचारी रोजगार हमी पेक्षाही कमी पैशात काम करतात; पुढे दिवस चांगले येतील असे कर्मचारी यांना वाटत होते.राजकारणी मंत्र्यांना शाळा, वाचनालये नकोत,जनता अडानी रहावी हा मूळ उद्देश आहे; अशी खोचक टीका नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे यांनी केली आहे.
पत्रे पुढे म्हणाले की,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,वाॾमयिन सेवा सेवेची जान,तेने मार्गी लागते जन,जन तितुका जनार्दन जाणूनी कार्य करावे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना केळुसकर गुरूजींनी बुद्ध चरित्र वाचायला दिले होते.महात्मा फुले,महात्मा गांधीं यांना पुस्तकातून प्रेरणा मिळाली होती.वाचनातून विचार समृद्ध झाल्याने माणूस अधिक प्रबुद्ध बनण्यास मदत होते.औपचारिक शिक्षणातून विद्यार्थी लिहिती वाचती बणुन केवळ साक्षर बनतील; पण वाचनाद्वारे ते सुसंस्कृत बनतील.आजचे हे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक म्हणून या भारत देशाच्या उज्वल भवितव्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलतील. भारतीय संस्कृती,त्यातील मूल्यव्यवस्था,हक्का बरोबरच जबाबदारीची जाणीव बालवयातच व्हायला हवी. ‘युवक वाचतील तर देश वाचेल’ अन्यथा शिक्षणाचा मुळ हेतू सफल होणार नाही.अमेरिकेत ग्रंथालयांना महत्व दिले आहे.आपले शासन देखावा निर्माण करतो,भिलार उभे करतो,प्रसिद्धी करतो पण कृतित नाही.मतांसाठी सर्वांचे लाड पुरवितो.सार्वजनिक ग्रंथालये,शाळा याकडे दुर्लक्ष करतो आहे.प्रथम ग्रंथालयांना,कर्मचारी यांना सक्षम करा,नंतर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा करा; असेही पत्रे यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!