Monday, August 17, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमहाराष्ट्रात असाही एक गाव; ज्यामध्ये ५० पेक्षा जास्त मुले सरकारी नोकरीवर- गावात...

महाराष्ट्रात असाही एक गाव; ज्यामध्ये ५० पेक्षा जास्त मुले सरकारी नोकरीवर- गावात केवळ ७५ घरे…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- आपण नेहमीच बघत असतो की काही शहरे वा गावाची त्याच्या वेगळेपणामुळे किंवा वैशिष्ट्यांमुळे ख्याती निर्माण झालेली असते.असाच महाराष्ट्रात एक गाव आहे की,गावामधे केवळ ७५ घरे आहेत.मात्र गावात ५० पेक्षा जास्त मुले सरकारी नोकरीवर आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील सानपवाडी असे गावाचे नाव आहे.गावात पाच इंजिनियर,सहा डॉक्टर,एक उपविभागीय अधिकारी,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,एक पोलीस निरीक्षक,२३ पोलीस कर्मचारी,पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात असून गावची लोकसंख्या ४०० इतकी आहे.

दरवर्षी कुठल्याही प्रकारची भरती असो; भरती परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची गावातील नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. सुरुवातीपासूनच म्हणजेच प्राथमिक शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गावातील शाळेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात येत असल्याने विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी हिरीहिरीने भाग घेऊन यश संपादन करीत असतात.प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना गोडी लागत असल्याने कोणत्याही शाखेची पदवी जरी मिळाली तरी स्वतःहून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात.गावात एकप्रकारे तश्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!