Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरमहसूल मंत्र्यांच्या धडक कारवाईने सर्वांचे थाटरे फरार.. आज एका उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन;...

महसूल मंत्र्यांच्या धडक कारवाईने सर्वांचे थाटरे फरार.. आज एका उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन; अवैध वाळू उपसा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे उद्या,रविवार १४ डिसेंबरला सूप वाजणार आहे; म्हणजेच हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे.तत्पूर्वी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच विरोधकांनी विविध मुद्दे मांडून अधिवेशन गाजविण्याचा प्रयत्न केला.पण,राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला तो सर्वांचे थाटरे फरार करणारा ठरला आहे.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार,चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांच्या निलंबनाची घोषणा केलेली असतांनाच परत आज,शनिवार १३ डिसेंबरला भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणी उपविभागीय अधिकारी(SDM)गजेंद्र बालपांडे यांच्या निलंबनाची विधानसभेत घोषणा केली. त्याचबरोबर,सेवानिवृत्त झालेले तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्यावरही गुन्हेगारी खटला दाखल करण्याची कारवाई केली जाईल,असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.अवैध वाळू उपसा प्रकरणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.सदरचे प्रकरण हे दोन वाळू घाटांच्या डेपोंशी संबंधित असून बेटाळा दक्षिण आणि बेटाळा उत्तर येथील वाळू घाट केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर,मालाड,मुंबई या कंपनीला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते.पवनीच्या तहसीलदारांना २५ मे २०२५ रोजी गुळेगाव येथील वाळू डेपोमध्ये ३४ हजार ६०० ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा झाल्याचा अहवाल तलाठींनी दिला होता.मात्र,तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी बालपांडे यांनी तलाठींच्या अहवालावर कारवाई केली नाही.सोनवणे यांचे ‘सर्वात मोठे रॅकेट’ असून बालपांडे आणि सोनवणे यांनी बेकायदेशीर वाळू घाटांवर कधीही कारवाई केली नाही,उलट त्यांना संरक्षण दिले,ज्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले,असा आरोप मंत्री बावनकुळे यांनी केला.प्रकरणात जिल्हा खनीकर्म अधिकारी यांची जास्त चूक असल्याचे मान्य करत खनीकर्म मंत्र्यांकडे जिल्हा खनीकर्म अधिकारी यांचीही चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.आज उपविभागीय अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले असून महसूल विभागातील काही अधिकारी,कर्मचारी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी सारवासारव करून आम्ही काय केले,याचा लेखाजोखा मांडू लागलेत.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!