Monday, May 18, 2026
Homeनागपूरमहसूल मंत्री बावनकुळे यांच्या बाबत फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या बाबत फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांविषयी चुकीची,खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे.प्रकरणी निखिल रामचंद्र इंगळे यांनी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १ हजार १४७ एकर जमीन असल्याचा दावा केला होता.सदरचा व्हिडिओ ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला.या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाल्याने नागपूर शहराच्या कोराडी पोलीस ठाण्यात रामेश्वर दरेकर विरोधात काल, शुक्रवारच्या रात्री उशिरा भारतीय न्याय संहिता (बीएनएस)२०२३ अंतर्गत कलम ७८(१)(ii) आणि ३५६(२)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्यातच कामठी तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण जमीन २८.४४ एकर आहे.सदरची जमीन विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये नोंद आहे.१ हजार १४७ एकरचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणात कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.सोशल मीडियाचा वापर एखाद्याची नाहक बदनामी वा तथ्यहीन माहिती प्रसारित करण्याकरीता नसून आता माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत(आय टी ॲक्ट)गुन्हे दाखल करण्यात येतात.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!