- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली.आकाश सुरेश नेवारे वय २५ वर्षे, रा.तेलंगखेडी,अंबाझरी,नागपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार आज सोमवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास आकाशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचे पथक व गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येचा तपास सुरू केला आहे.दरम्यान,सीताबर्डी पोलिसांनी २० वर्षीय पियुष उर्फ पेढा बघेल,२५ वर्षीय विशाल उर्फ बब्बू काल्या चचाणे, रंजित माहतो,अंकुश मरसकोल्हे,सचिन सेलारे व अन्य काही संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हे शाखेच्या पथक दोन कडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.आकाश नेवारे याची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद,पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला,याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.आकाशचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि शरीरावरील जखमांची अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. प्रकरणी सीताबर्डी पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

