Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीमतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार त्यांना नियमितपणे प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)संबंधित मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारतील.या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील.
भारत निवडणूक आयोगाचे २६ सप्टेंबर २०२६ रोजीचे प्रसिद्धीपत्रक आणि त्याअनुषंगाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे.नोटीस प्राप्त मतदारांना संबंधित बीएलओकडे व्हॉट्सॲपद्वारेही आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावे सादर करता येतील.
जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांकडून केवळ त्या विसंगतीशी संबंधित कागदपत्रे स्वीकारण्यात येतील.संबंधित कागदपत्रे किंवा बीएलओचा पडताळणी अहवाल अथवा पंचनामा यांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल.
विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसल्यास,केवळ अशा अपवादात्मक प्रकरणांत संबंधित अधिकाऱ्यांकडून शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्यात येईल.या सुनावणीला संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकेल.पुढील कार्यवाही करण्यापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी देणे,सुनावणी घेणे आणि आदेश पारित करणे ही प्रक्रिया राबविण्यात येईल.
मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रनिहाय आयोजित विशेष शिबिरांतही नोटीस प्राप्त मतदारांना कागदपत्रे सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.याअंतर्गत ३ व ४ ऑक्टोंबर रोजी शिबिरे आयोजित करण्यात आली असून,पुढील शिबिरे १० व ११ ऑक्टोंबर २०२६ रोजी होणार आहेत.
बेघर मतदार,कामगार,गरीब व्यक्ती,आदिवासी समाजातील विशेषतः विशेष असुरक्षित आदिवासी गटांतील(पीव्हीटीजी)व्यक्ती,अनाथ व्यक्ती आणि इतर असुरक्षित गटांतील मतदारांसाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतील समावेशापासून वंचित राहू नये,यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि कागदपत्रे स्वीकारण्यासाठी बीएलओ राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय ठेवतील.कागदपत्रे स्वीकारण्यासाठी घरी येणाऱ्या बीएलओंना संबंधित मतदारांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे.लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाईल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!