Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीभारत बंद ला गडचिरोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.. - देसाईगंजसह कुरखेडा,चामोर्शी,मुलचेरा व इतर...

भारत बंद ला गडचिरोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.. – देसाईगंजसह कुरखेडा,चामोर्शी,मुलचेरा व इतर तालुक्यात कडकडीत बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसुचित जाती,जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज २१ ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह देसाईगंज,चामोर्शी, कुरखेडा,मुलचेरा आदी तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.
देशातील महान संत,थोर महापुरूषांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली. महत्प्रयासान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती समाजाला संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली.त्याला संवैधानिक मान्यता प्रदान केली.त्यामुळे अनुसूचित जाती,अनुसूचित जमातींच्या लोकांमध्ये सामाजिक एकता निर्माण झाली,अन्यायाविरूध्द लढण्याची कुवत निर्माण झाली.मात्र,अनुसूचित जाती, जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती,जमातींचे आरक्षण संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात अनुसूचित जाती, जमातींमधील सर्व समाज एकवटला असून आज, बुधवार दिनांक-२१ ऑगस्ट  रोजी सामुहीक कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.त्यामुळे सगळीकडेच देसाईगंज व इतर तालुक्यात शुकशुकाट दिसून आला.
प्रमुख मागण्या👇
केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तात्काळ अनुसूचित जाती,जमातींच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करावा.त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशाप्रकारचे उपवर्गीकरण अथवा क्रिमिलेअर लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी.अनुसूचित जाती,जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची निवड करतांना कॉलेजीअम सिस्टम बंद करून न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून,परिक्षा घेऊन करण्यात यावी; इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!