Monday, August 17, 2026
Homeलाखांदूरभरधाव वाहनाने सहा वर्षीय बालकास दिली धडक- चप्राड बसस्थानक परिसरातील घटना

भरधाव वाहनाने सहा वर्षीय बालकास दिली धडक- चप्राड बसस्थानक परिसरातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लाखांदूर:- भरधाव वाहनाने धडक दिल्याने सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथी बसस्थानक परिसरात रविवारी घडली.बालकाला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रणय भाष्कर भुते (६) रा. चप्राड ता.लाखांदूर असे जखमी बालकाचे नाव आहे.प्रणय पहिल्या वर्गात शिकत असून रविवारी शाळेला सुटी असल्याने तो बसस्थानक परिसरात उभा होता.त्यावेळी भरधाव वाहनाने (क्र एमएच ३४ बीआर ८१४४) प्रणयला जबर धडक दिली.यात प्रणय गंभीर जखमी झाला आहे.

गावकऱ्यांनी तात्काळ त्याच वाहनाने उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र प्रणयची प्रकृती गंभीर असल्याने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!