उद्रेक न्युज वृत्त
बिहार :- हाजीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका बोगस डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या बेकायदेशीर नर्सिंग होममध्ये प्रथम मुलीचा गर्भपात केला.त्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्याला खायला दिले. यादरम्यान या तरुणीचाही मृत्यू झाला.मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली.
पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.तसेच डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएसची डिग्री नसल्याचेही उघडकीस आले आहे.घटनेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत.पोलिस फरार दाम्पत्याचा शोध घेत आहेत.
वैशाली जिल्ह्यातील बालीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपापूर अग्रेल येथे भयावह घटना घडली आहे.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तरुणीच्या नातेवाईकांना नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती.डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले. मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली.यामुळे डॉक्टर दाम्पत्य घाबरले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नवजात अर्भक आपल्या पाळीव कुत्र्याला खायला दिले.दुसरीकडे मुलीची प्रकृती खालावल्याचे पाहून नातेवाइकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.सध्या डॉक्टर दाम्पत्य फरार आहे त्यांचा शोध सुरू आहे.