Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीबेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी; रोजगार मेळाव्याचे आयोजन..

बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी; रोजगार मेळाव्याचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता/ उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली,महिला महाविद्यालय गडचिरोली व फुले,आंबेडकर महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,बुधवार १८ मार्च रोजी सकाळी दहा वाजेपासून महिला महाविद्यालय चंद्रपूर रोड,गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी नामांकित कंपनी/आस्थापनांमध्ये विविध रोजगार व नोकरीच्या संधीसाठी उद्योजक विविध पदांसोबत सहभाग होणार असून बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत विविध पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे.तरी,गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यास १८ मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून महिला महाविद्यालय,चंद्रपूर रोड,गडचिरोली येथे उपस्थिती राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं-२,कॉम्प्लेक्स, गडचिरोली-४४२६०५ तसेच ई-मेल gadchirolirojgar@gmail.com व संपर्क क्रमांक- श्रीमती सक्रापूरे–8788257016 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!