उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याला लागून असलेल्या ओडिशाच्या सीमावर्ती भागात नक्षलवादविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलास मोठे यश मिळाले आहे.शेजारील राज्य ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात एकूण ११ कट्टर नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे गुडघे टेकले आहे.या नक्षलवाद्यांनी ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांच्यासमोर शस्त्रे टाकत मुख्य प्रवाहात परतण्याची घोषणा केली असून आत्मसमर्पण करणाऱ्या ११ नक्षलवाद्यांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.हे सर्वजण दीर्घकाळापासून ‘वंशधारा-नागावली’ विभागात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे.सदरचे नक्षलवादी संघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते आणि अनेक कारवायांमध्ये सामील होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नकुल चंद्रा याच्यासह एसीएम रँकचे अनेक नक्षलवादी देखील आहेत. त्यांच्याकडून एके-४७,एसएलआर,इन्साससह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
तब्बल ११ कट्टर नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे टेकले गुडघे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

