उद्रेक न्युज वृत्त :- प्राथमिक आरोग्य केंद्रात खालील सुविधा ठेवणे बंधनकारक आहे.अशा खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध हव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रास दरवर्षी लाखो रुपयांचा रुग्ण कल्याण निधी मिळतो. तो नेमका खालील कामासाठी खर्च होतो की नाही? हे माहितीचा अधिकार वापरून तपासले पाहिजे.
१. स्वच्छ बेडसीट व चादर
२. स्वच्छ शौचालय / स्वच्छतागृह
३. ॲडमिट रुग्णांसाठी मोफत जेवण
४. आरोग्य केंद्राची नियमित साफसफाई
५. स्वच्छ पिण्याचे पाणी
६. मोफत रक्त,लघवी थुंकी तपासणी सुविधा
७. मोफत व पुरेशी औषधे
८. रुग्णांना व नातेवाईकांना बसायला जागा
९. रुग्णांसाठी पुरेशा खाटा
१०. गंभीर रुग्णांना मोठ्या दवाखान्यात पाठविण्यासाठी गाडीची सुविधा व इतर सुविधा तपासणे आवश्यक आहे.तसेच आवश्यक तितकी आरोग्य सेवा वेळेवर व किमान गुणवत्तेच्या स्वरुपात मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे.आरोग्य सेवा देणारी यंत्रणा आपल्यासाठी आहे.आपण यंत्रणेसाठी नाही आहोत; हे नेहमी लक्षात घ्या.आरोग्य सेवा कशी चालवली जाते.याचा अभ्यास करून नागरिकांच्या गटाने त्यावर सामुहिक देखरेख करणे हाच ही यंत्रणा नीट व ठीक चालविण्यासाठी आवश्यक आहे.