Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोली प्रशांत मडावी यांची गोंगपाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

 प्रशांत मडावी यांची गोंगपाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

प्रा. मुनिश्र्वर बोरकर/ गडचिरोली

गडचिरोली :-गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष पदी स्व.शामकांत मडावी यांचे सुपुत्र प्रशांत शामकांत मडावी रामनगर, गडचिरोली यांची निवड गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिष उईके मुंबई यांनी नियुक्ती पत्र देवून गोंगपाचे प्रदेश महासचिव सुधाकर आत्राम यांनी पिपरटोला (नरचुली ) येथील विरांगणा राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात प्रशांत मडावी यांना पक्षाचा पिवळा दुप्पटा बांधुन नियुक्ती पत्र दिले व गोंगपाचे पुढील कार्य व्यवस्थित रित्या पार पाडून पक्ष बळकट करण्याकरीता शुभेच्छा दिल्या.

प्रशांत मडावी यांनी गोगपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्राम व महासचिव हरिष उईके यांचे आभार मानले.प्रशांत मडावी हे यापूर्वी गोंगपाचे युवा अध्यक्ष म्हणुन काम करीत होते.एक धडाडीचे , तडफदार नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख आहे.गोंगपा पक्ष मजबुत करुन,आदिवासी बांधवाची सेवा,समस्या शासन दरबारी माडून न्याय मिळवून देणार असल्याची प्रशांत मडावी यांनी ग्वाही दिली.प्रशांत मडावी यांच्या नियुक्ती बद्दल गोंगपाचे जेष्ट नेते दिवाकर पेंदाम चंद्रपूर, प्रा.रमेश कोरचा कोरची,चरणदास पेदांम, मालती पुडो गडचिरोली,साईनाथ कोडापे,रविंद्र कोवे महाराज चामोर्शी,अतांराम पदा सर धानोरा,दिलीप सिंह पेंदाम आरमोरी,विकास कन्नाके वडसा,युवा नेता विनोद मडावी पोटेगांव,काटेंगे महाराज रांगी आदी गोंगपाच्या प्रमुख कार्यकर्त्या सहित रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर,शेट्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे आदींनी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!