Monday, March 17, 2025
Homeगडचिरोलीप्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रुडे- जागतिक क्षयरोग दिन...
spot_img

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रुडे- जागतिक क्षयरोग दिन साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोली अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन आज २४ मार्च रोजी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु.डॉ.साळुंके,जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली डॉ.दावल साळवे,डॉ.पंकज हेमके,डॉ. मशाखेत्री,डॉ.नागदेवते,डॉ.मनिष मेश्राम,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके,वैद्यकिय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र गडचिरोली,डॉ.प्रफुल गोरे आदि उपस्थित होते. 

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यातील १३ क्षयरोग पथकाअंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करुन शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढुन जनजागृती करण्यात आली.जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन हेमके यांनी केले.त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत यावर्षी घोषीत करण्यात आलेल्या “होय आपण टीबी संपवु शकतो” या घोषवाक्याचे महत्व पटवुन दिले तसेच देशाला क्षयमुक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा तसेच याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये क्षयरोगाला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तिंनी सहकार्य केले पाहिजे तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग घेवुन क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार पुरविण्यास सहकार्य करण्यास सांगीतले.तसेच उद्घाटनीय भाषणामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.गडचिरोली डॉ.दावल साळवे,यांनी आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संशयीत क्षयरुग्ण शोधुन काढावित व त्यांची पुर्ण तपासणी करुण औषधउपचार सुरु करावा असे सांगीतले.२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ठ कार्यकर्त्या म्हणुन आशा वर्कर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन गणेश खडसे व आभार प्रदर्शन प्रसेनजीत कोटांगले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील मनिष बोदेले,अनिल चव्हाण,महादेव वाघे,राहुल रायपुरे,विनोद काळबांधे,ज्ञानदिप गलबले,विलास भैसारे,शरद गिऱ्हेपुंजे,विलास कुंभारे,एन.एस.आखाडे,अंकुश डोंगरे,दामोधर गुंडावार,अनिल कतलपवार, आकनुरवार,चिल्लावार,विशाल उज्जैनवार,संजय पन्सारे,लता येवले,वंदना राऊत,लक्ष्मी नागेश्वर,ब्रिंदा सरकार,सरीता बन्सोड,आदिंनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!