Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीप्रत्यक्ष कामावर सिमेंट वापरला जातो दुसराच व बिल निघतो तिसराच......!- तेरी भी...

प्रत्यक्ष कामावर सिमेंट वापरला जातो दुसराच व बिल निघतो तिसराच……!- तेरी भी चूप,मेरी भी चूप; शासकिय बांधकामातील प्रकार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात हल्ली मोठ्या प्रमाणावर धूमधडाक्यात शासकीय बांधकामे सुरू असून सुरू असलेल्या बांधकामात एक आगळा-वेगळा प्रकार खाजगी कंत्राटरांकडून पहावयास मिळतो आहे. प्रत्यक्ष बांधकामात निकृष्ट दर्जाचा सिमेंट वापरला जात असून देयके(बिल)काढतांना ज्या सिमेंटचे दर जास्त अशाचे बिल जोडून शासनाच्या तिजोरीवर डल्ला घात असल्याचे सर्वत्र प्रकार नजरेसमोर प्रत्यक्ष दिसूनही न दिसल्यासारखे अधिकारी,कर्मचारी भासवत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’असा सर्वत्र खेळ सुरू आहे.

शासकिय बांधकामात गडचिरोली जिल्हा व पैस्यावर भिल्ला अशी अवस्था झाली आहे.खाजगी कंत्राटदार मोठ्या प्रमाणावर शासकीय बांधकामे करतांना दिसून येत आहेत.पैश्याच्या हव्यासापोटी अनेक बांधकामांवर निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जाते आहे.कोणत्याही कंपनीचे सिमेंट वापरून बांधकामे पूर्ण तर केली जातात.मात्र देयक(बिल)काढायचे वेळेस वेगळ्याच सिमेंटचे बिल जोडली जातात.जसे, उदाहरणार्थ प्रत्यक्ष बांधकामात गोल्ड सिमेंट वापरला जातो तर बिल अल्ट्राटेक सिमेंटचे काढले जाते.बिल तर सोडा सिमेंट वापरावयाच्या वेळेस साधी प्रयोग शाळेतून चाचणीही केली जात नसल्याचे अनेक शासकीय बांधकामांवर दिसून येत आहे.चाचणी करण्याचा मुख्य उद्देश बांधकामात वापरले जाणारे सिमेंट निकृष्ट आहे की, योग्य प्रतीचे आहे; यासाठी चाचणी अहवाल महत्वाचा ठरतो.मात्र असे होतांना दिसून येत नसल्याने चोरीचा मामला हळूचकन बोंबला असे सर्व प्रकारावरून दिसून येत असल्याने यावर आळा बसणे आवश्यक आहे.यासाठी नागरिकांनी सुरू असलेल्या कामांवर जाऊन माहिती घ्या व जॉब विचारा; सर्वसामान्य नागरिकांनी आपला अधिकार विसरू नका.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!