Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवत राहुल गांधी,प्रियंका गांधी व संजय राऊतांना घेतले...

पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवत राहुल गांधी,प्रियंका गांधी व संजय राऊतांना घेतले ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ‘मोहब्बत की दुकान’ म्हणविल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत बोगस मतदारांचा चीट्टा उघडपणे जाहीर केल्यानंतर आज,सोमवार ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीने दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला.मोर्चात इंडिया आघाडीचे शरद पवार,संजय राऊत,अखिलेश यादव,प्रियांका गांधी,मल्लिकार्जुन खर्गे आदींसह जवळपास ३०० खासदार मोर्चात सहभागी झाले.सदरचा मोर्चा संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या मार्गाने जात असतांनाच मोर्चा पोलिसांनी अडविल्याने खासदारांनी ठिय्या मांडला. दरम्यान,पोलिसांनी राहुल गांधी,संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चात इंडिया आघाडीतील २५ घटक पक्ष सहभागी झाले. ताब्यात घेतलेल्या खासदारांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले.संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत.आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे, ‘एक व्यक्ती एक मत’ यासाठी आमची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल रविवारी या मोर्चाची घोषणा केली होती.सदर मोर्चाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात न आल्याने दिल्ली पोलीसांनी अडवणूक करून सर्वांना ताब्यात घेतले.यादरम्यान अखिलेश यादव बॅरिकेड्सवर चढून पुढे गेले.प्रियंका गांधी देखील विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत घोषणाबाजी करीत होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!