Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीपुणे येथे नाटककार चुडाराम बल्हारपुरे उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्काराने सन्मानित..

पुणे येथे नाटककार चुडाराम बल्हारपुरे उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी झाडीपट्टीतील प्रसिद्ध  तथा महसूल विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेवा निवृत्त कर्मचारी व साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती,संवाद पुणे व यशदा पुणे यांचे वतीने दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे करीता राज्य स्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात तांत्रिक विषयावरील विषयविशिष्ट साहित्य संवर्गातील मराठी नाट्यवाड्.मय साहित्य प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित व नाट्यश्री निर्मीत जत्रा घडली नागोबाची या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या भव्यदिव्य दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन-२०२६ तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश भागवत(भा.प्र.से.अतिरिक्त पोलिस महासंचालक,कायदा व सुव्यवस्था,तेलंगणा), पुर्वाध्यक्ष शेखर गायकवाड(भा.प्र.से.अतिरिक्त महासंचालक,यशदा पुणे),यांचे हस्ते व राजीव नांदकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक- यशदा पुणे),डॉ.किरण धांडे(भा.प्र.से.तथा प्र.अ. प्रकाशन,यशदा पुणे),वैशाली पतंगे(भा.प्र.से.यशदा पुणे),व्यंकटेश कल्याणकर(भा.प्र.से.तथा प्रकल्प संशोधक,यशदा पुणे),सार्थक थोरवत(भा.प्र.से. माध्यम व प्रकाशन केंद्र,यशदा पुणे) तसेच अनेक भा.प्र.से. व महाराष्ट्र शासन सेवेतील अनेक उच्च पदस्थ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप  आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशामुळे महसूल विभागाची तसेच गडचिरोली जिल्ह्याची व झाडीपट्टीची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,सुनील चडगुलवार(से.नि.नायब तहसीलदार)महसूल विभाग,झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली व झाडीपट्टी लेखक संघटना गडचिरोली जिल्हा यांनी व्यक्त केली असून त्यांचे सर्वत्र कौतुकाची थाप यासह प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे, नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी,साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!