Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीपुढील ४८ तासात मुसळधार पाऊस…-आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट..

पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस…-आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारे गडचिरोली जिल्ह्यात पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यातील विरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस,तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस तसेच विरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.याबाबत नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

हवामान विभागाने आज,दिनांक-१८ जुलै,२०२४ करिता ऑरेंज अलर्ट तर उद्या १९ जुलै रोजी रेड अलर्ट तसेच दिनांक- २० जुलै, २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट बाबत इशारा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तु,विद्युत खांब वा झाडाजवळ राहू नये,झाडाखाली आसरा घेवू नये. मुसळधार अति मुसळधार पाऊसामुळे नदी,नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकिना-यावरील गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी; तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये.तलाव / बंधारा / नदी इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी जाऊन सेल्फीच्या नादात जीव गमावण्याच्या घटना प्रामुख्याने दिसून येतात.

सबब सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नदी/ तलाव / बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी; सेल्फीचा मोह करु नये; असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!