Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान योजनेच्या २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार..

पीएम किसान योजनेच्या २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजनचे जून महिन्यात जमा होणारे २ हजार रुपये महिना संपूनही मिळाले नसल्याने राज्यातील शेतकरी बांधव दोन हजाराची आतुरतेने वाट पाहत आहेत.अश्यातच आता पीएम किसान योजनेच्या २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती आहे.याबाबत अद्याप अधिकृत घोषणा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नसली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ जुलै रोजी बिहारमधील मोतिहारीला भेट देणार आहेत.अशा परिस्थितीत,या काळात पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जारी केला जाऊ शकतो.विशेष म्हणजे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा मागील १९ वा हप्ता हा २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून जारी केला होता.त्यानुसार देशातील ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यातच आता जून महिना संपून जुलै महिना लागला आहे.त्यामुळे येत्या पुढील काही दिवसांत पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!