उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा सूनावल्या नंतर त्यांचे खासदाकीचे ही पद रद्द करण्यात आल्याने सर्वत्र त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.अशातच सत्ताधारी यांच्या विरोधात राज्यात काँग्रेस कडून आंदोलने करून निषेध करण्यात येत आहे.अशाच प्रकारचे आंदोलन नागपुरात भर पावसात काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार भर पावसात कार्यकर्त्यांसह बसून सत्याग्रह करीत आहे.पावसापासून बचाव करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या होत्या.तर काहींनी मात्र पावसात ओले होण्याचा आनंद घेतला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंदोलना दरम्यान आलेल्या अवकाळी पावसात ओले चिंब झाले.मात्र ते आपल्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम होते.निसर्गही आमची परीक्षा पाहत असल्याचे त्यांनी म्हटले.निसर्ग जरी आमची परीक्षा पाहत असला तरी सुद्धा आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मत व्यक्त केले.