Sunday, May 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निर्दयी पाकिस्तान निष्पाप लोकांचे जीव घेऊन साध्य काय करते? हेच कळेनासे झाले आहे.दहशतवाद्यांना पाठीशी धरून,हातात बांगड्या घालून स्वतःला पाकिस्तान मोठा हुशार समजू लागला आहे.सध्या स्थितीत ‘अक्कल बडी की भैस’ अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.अशातच पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नसल्याने भारताने चोख प्रत्युत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे  नष्ट केले.त्यामुळे भांबरेजलेला पाकिस्तान मिसाइल-ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे; दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत.त्यातच आज,शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले.पण पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण आले.काश्मीर सीमेवर पहाटे तीनच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.तेव्हा जवान मुरली नायक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत पाच जणांचा खात्मा केला.शत्रूशी झुंज देतांना मुरली नायक यांना वीरमरण आले.जवान मुरली नाईक यांचे मूळ गाव आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्की तांडा असून हल्ली मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर येथे वास्तव्याला होते.नाईक यांचे कुटुंबीय २ मे ला त्यांच्या मूळ गावी गेले असल्याने शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर उद्याला मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!