- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वारंवार विनंती करूनही माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने वैतागलेल्या पतीने तिच्या विरहात घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली असल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी (नवीन) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू येरखेडा येथे रविवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
कमलराम नथुराम सिन्हा वय २२ वर्षे,रा.साईप्रसाद लेआऊट,न्यू येरखेडा,ता.कामठी असे मृताचे नाव आहे.कमलरामने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याला एक वर्षांचा मुलगा आहे.आई-वडिलांशी पटत नसल्याने तो येरखेडा येथे वेगळा राहात होता.सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी कन्हान,ता.पारशिवनी येथे गेली.तिला परत आणण्यासाठी त्याने खूप विनंती व प्रयत्न केले.मात्र,त्याला यश आले नाही.
त्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या खोलीत छताच्या हुकला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतला. आई वडिलांना कळताच त्यांनी दार तोडून त्याला खाली उतरविले आणि हॉस्पिटलमध्ये नेले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश पठाडे करीत आहेत.
कमलरामने रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.थोडे बरे वाटताच त्याने कुणालाही न सांगता हॉस्पिटलमधून पळ काढला होता.त्या रात्री त्याने आई-वडिलांसोबत जेवण केले आणि पत्नीला व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते.पत्नीने लगेच त्याच्या आई-वडिलांना कळविले.मात्र,तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
- Advertisement -