Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपक्षाने तब्बल पाच वेळा उमेदवारी नाकारली; कार्यकर्त्याने चौकात बॅनर लावून दिले धन्यवाद..

पक्षाने तब्बल पाच वेळा उमेदवारी नाकारली; कार्यकर्त्याने चौकात बॅनर लावून दिले धन्यवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण बरीच वर्षे एखाद्या पक्षाशी एकनिष्ठ राहून विविध कार्ये पार पाडतात आणि आपले नावलौकीक करून घेतात.अश्यातच अनेकजण ऐन निवडणुका आल्या की उमेदवारीवरून वा आपल्याला आता पक्षात कोणी विचारत नाही म्हणून इतर पक्षात उडी घेतांना दिसून येतात व आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करीत असतात.त्यातच या पक्षातून त्या पक्षात उडी घेणाऱ्या काहीजणांची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी होऊन बसते.मात्र,या सर्वांना अपवाद म्हणून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याची चर्चा एका बॅनरमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागली आहे.महत्वाचे म्हणजे,वाशिम शहरातील भाजपा विभागीय सह संयोजक अभियंता सेलच्या कार्यकर्त्याची तब्बल पाच वेळा उमेदवारी नाकारल्याने थेट शहरातील चौकात बॅनर लावून आपली उमेदवारी कापणाऱ्यांना धन्यवाद दिले आहे.
सध्या सर्वत्र नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.अश्याच प्रकारे वाशिम नगरपरिषदेसाठीही निवडणूक सुरू आहे.या निवडणुकीसाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी धनंजय घुगे यांनी उमेदवारी मागितली होती.पण, पक्षाने काही कारणास्तव त्यांना उमेदवारी नाकारली.यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त न करता थेट शहराच्या एका मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावून त्यावर ‘पुन्हा एकदा आपली उमेदवारी कापल्याबद्दल संबंधितांचे आभार मानले.या बॅनरवरील मजकूर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि मजकूर वाचल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
धनंजय घुगे यांनी बॅनरवर म्हटले आहे की,स्वाभिमानी योद्धा,निष्ठावंत मावळा,पुन्हा एकदा माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद.कारण,२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी डावलली,२०१६ मध्ये नगरपालिकेची उमेदवारी डावलली,२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली,२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली आणि आता पुन्हा २०२५ मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत माझी उमेदवारी कापली.तरीही मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि कायम राहील.पद व सत्तेसाठी मी हपापलेला नाही हे दर्शवून देण्याची संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद.आपला कायम भावी धनंजय घुगे,विभागीय सह संयोजक अभियंता सेल भाजपा.दुसरीकडे,धनंजय घुगे यांनी आपण हे बॅनर का लावले यावर स्पष्टीकरण देत,मला उमेदवारी नाकारल्यानंतर माझ्याविषयी माझ्या प्रभागात अनेक अफवा पसरत होत्या,पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि ती नाकारल्यामुळे मी पक्षांतर करेल किंवा पक्षविरोधी काम करेल असे सांगितले जात होते.पण,तसे काहीही नाही हे स्पष्ट करण्यासाठी मी हे बॅनर लावले, असे ते म्हणाले.यावरून खरा पदाधिकारी वा कार्यकर्ता तोच असतो जो पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यावर मात करतो,हे धनंजय घुगे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!