Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग.. - वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी वाढवला संपर्क..

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग.. – वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी वाढवला संपर्क..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 
निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट होताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.आरक्षण सोडतीनंतर तर सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यरत झाले असून काही हंगामी नेतेही मैदानात उतरतांना दिसत आहेत.यासाठी त्यांनी आपल्या प्रचारासाठी मतदारांशी भेटीगाठी सुरू करून नागरिकांसोबत चर्चा करतांना त्यांचे दर्शन होत आहे. येत्या काही दिवसांत नगरपालिका,जिल्हा परिषद, नगरपंचायती,पंचायत पंचायत निवडणुकांच्या
आचारसंहिता लागू होणार आहेत.यामुळे राजकारण अधिकच तापू लागले आहे.अश्यातच हंगामी नेतेही आपण मैदानात असल्याचे दाखवून देतांना दिसत आहेत.इच्छुकांकडून प्रचारावर अधिक जोर लावला जात असून तिकीट मिळाले नसले तरी मतदारांशी त्यांनी संपर्क वाढविण्यास सुरू केल्याचे दिसते.यंदा निवडणुकांमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता असून फक्त निवडणुकीच्या काळात दिसणाऱ्यांची अडचण वाढण्याची चिन्हे आहेत.तर पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे सर्वच पक्ष सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात आहेत.आता मागील काही महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवला आहे.पक्षांकडून अद्याप तिकीट वाटप झाले नसले तरी इच्छुकांनी जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी वाढवत मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.प्रत्येक इच्छुक उमेदवार मतदारांना पटवण्यासाठी हवी तशी आश्वासने देत आहेत; मात्र या वचनांची वास्तवता ओळखण्यात मतदार पारंगत झाले आहेत.कोण केवळ निवडणुकीपुरता सक्रिय आहे आणि कोण सतत संपर्कात राहतो,हे मतदारांना माहिती आहे.त्यामुळे “उधार से आणे दो अन् इसको जाणे दो” असे चित्र निर्माण होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!