Monday, April 27, 2026
Homeगडचिरोलीनिवडणुकांचा बिगुल वाजणार.. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप...

निवडणुकांचा बिगुल वाजणार.. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजी निर्गमित आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग व १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.ही प्रारूप प्रभाग रचना सोमवार १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयातील सूचना फलकावर,जिल्हा परिषद कार्यालय,सर्व तहसील कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप रचनेवर कुठल्याही प्रकारची हरकत अथवा सूचना असल्यास संबंधित नागरिकांनी त्यांची समर्पक कारणासह लेखी हरकत/सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे येत्या,सोमवार २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावी.या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत,असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!