Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीनिलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर - ५ मार्च ला...
spot_img

निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर – ५ मार्च ला चंद्रपुर येथे होणार पुरस्कार वितरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली : –  लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे यावेळी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

निलेश सातपुते हे गत २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते  राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून लोकवृत्त न्यूज चे संपादक आहेत व गडचिरोली नामांकित पत्रकार आहे. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वतंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीयझ प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना वाच्याता फोडली. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे.नुकताच त्यांनी ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार सोहळा व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर परिचर्चा घडवून आणले व डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. 

तसेच यावरच न थांबता त्यांनी आपल्या संकल्पनातून डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना एकत्रित आणून त्याकरिता विविध कल्याणकारी योजनेसह विमा कवच व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र अभ्यास दौरा नियोजन करून आयोजन केलेले आहे. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्याचे त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज तर्फे यावर्षीचा डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून निलेश जीवनदास सातपुते यांना जाहीर केला आहे.

अपेक्षित, वंचित, शोषित दिन दुबळ्या साठी काम केले हे माझे मार्गदर्शक मोरेश्वर उद्योजवार खरे वृत्तांत न्यूज संपादक व माझे स्नेही सचिन जिवतोडे संपादक The गडविश्व न्यूज गडचिरोली यांच्यामुळे शक्य झाले. प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेतली याचा मला खूप आनंद झाला. मी या प्रतिष्ठानचा आभारी आहे, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली, हा पुरस्कार मी माझे पूज्य आई वडिलांना अर्पण करतो. पुरस्कार मला प्रेरणा देईल अशी भावना निलेश सातपुते यांनी व्यक्त केली

सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल होमदेवजी तुम्मेवार महाराष्ट्र मत न्यूज २४ तास संपादक, मित्रपरिवार, पत्रकार, डिजिटल मीडिया संपादक, व विविध स्तरातून तसेच मीडियामध्ये कार्यरत असलेल्या 

आदींकडून निलेश सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!