Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीनिर्लज्ज चोरटे; कुटूंब शहीद जवानाच्या शोकसागरात असतांना चोरट्यांनी केली घरफोडी..

निर्लज्ज चोरटे; कुटूंब शहीद जवानाच्या शोकसागरात असतांना चोरट्यांनी केली घरफोडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानाचे कुटुंब शोकसागरात असतांना निर्लज्ज चोरट्यांनी चक्क शहीद जवानाच्या गडचिरोली स्थित घरी डाव साधित घरफोडी केल्याची घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दिरंगी-फुलनार जंगल परिसरात मंगळवारी पोलिस-नक्षल चकमकीत सी-६० चे जवान महेश नागुलवार शहीद झाले होते.
बुधवारी नागुलवार यांच्या पार्थिवावर त्यांच्या स्वगावी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे अंत्यसंस्कार पार पडले.कुटूंबीय अनखोडा येथेच विरहात असतांना इकडे गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील कारमेल शाळा परिसरातील शहीद जवान नागूलवार यांच्या घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत,अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील आलमारी तोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले.मात्र,त्यांच्या हाताला काहीच न लागल्याने त्यांना परतावे लागले.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!