उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भरधाव वेगाने जाणारे स्कॉर्पिओ वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन एका घरावर धडकली.या अपघातात घरात उपस्थित असलेल्या जॉर्डन फिलिप जोसेफ या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आयबीएम रोडवर हा अपघात घडला.या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनात उपस्थित असलेल्या दोघा जणांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आयबीएम रोडवर हा अपघात झाला.वेगवान स्कॉर्पिओ कार भिंत तोडून अनियंत्रित होऊन घरात घुसली.अपघातानंतर घटनास्थळी लोकांचा जमाव गोळा झाला आणि जमावाने कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांनाही पकडून बेदम मारहाण करून पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघा जणांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.