Tuesday, September 15, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील ४७ वे सत्र संपन्न - ४७ व्या सत्रात चंद्रपूर...

नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४७ वे सत्र संपन्न – ४७ व्या सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील मधुकर दुफारे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे ४७ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी मधुकर श्रावण दुफारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “अंगण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
मधुकर दुफारे हे चिखलगाव,ता‌.ब्रम्हपुरी,जिल्हा- चंद्रपूर येथील नवोदित कवी असून अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांनी शंभरच्या वर कवितांचे लेखन केले आहे.ते नाट्यकलावंत देखील आहेत. नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भातील रानफुले’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ४७ व्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने, माधुरी अमृतकर,गणेश रामदास निकम,तुळशीराम उंदीरवाडे,पी.डी.काटकर,पुनाजी कोटरंगे,रोहिणी पराडकर,शैला चिमड्यालवार,प्रा.पंढरी बनसोडे, संगीता ठलाल,पुरुषोत्तम दहिकर,कुभावना रामटेके, अनुराग मुळे,प्रभाकर दुर्गे,उपेंद्र रोहनकर,राजेंद्र सोनटक्के,सोनाली रायपुरे-सहारे,मंदाकिनी चरडे, संतोष कपाले,वामनदादा गेडाम,रेखा दिक्षित,वंदना सोरते,किशोर बोरकुटे,उकंडराव नारायण राऊत, मुर्लीधर खोटेले,लता शेंद्रे,यामिनी मडावी,कृष्णा कुंभारे,मधुकर दुफारे,सुजाता अवचट,खुशाल म्हशाखेत्री,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!