Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेच्या ४५ व्या सत्रात रोहिणी पराडकर विजयी...

नाट्यश्री कविता स्पर्धेच्या ४५ व्या सत्रात रोहिणी पराडकर विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे ४५ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात कोल्हापूर येथील कवयित्री सौ.रोहिणी अमोल पराडकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “फराळाचे संमेलन” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
रोहिणी अमोल पराडकर हे कोल्हापूर येथील  प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आहेत.व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर असून अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे सदस्य आहेत.त्यांचे “काव्यांजली,दत्त शब्दांजली,बालगीत,चिवचिवाट,काव्यसरीता, आणि मधुबन” इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ४५ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने ऊकंडराव नारायण राऊत,जयराम धोंगडे,प्रा.पंढरी बनसोडे,सौ. वंदना राजेंद्र सोरते,राजेंद्र यादवराव सोनटक्के,पुनाजी कोटरंगे,पी.डी.काटकर, कु.भावना रामटेके,रोहिणी पराडकर,संगीता ठलाल,सुभाष धाराशिवकर,मारोती आरेवार,तुळशीराम उंदीरवाडे,माधुरी अमृतकर, मुर्लीधर खोटेले,प्रिती ईश्वर चहांदे,वामनदादा गेडाम, रोशन येमुलवार,नरेंद्र गुंडेली,लता शेंद्रे,यामिनी मडावी, संतोष कपाले,पुरुषोत्तम दहिकर,शैला चिमड्यालवार, सुजाता अवचट,रेखा दिक्षित,वंदना मडावी,खुशाल म्हशाखेत्री, संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!