Wednesday, October 28, 2026
Homeनागपूरनागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.विशेष म्हणजे, पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निकाल स्पष्ट झाल्यास सायंकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.मात्र,दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागल्यास निकालासाठी रात्री उशीर होऊ शकतो.
काँग्रेसचे ॲड.अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.मात्र,या दोघांच्या विजयाच्या दाव्यांपेक्षाही माजी आमदार प्रा.अनिल सोले यांना किती मते मिळणार,याची चर्चा अधिक रंगली आहे. दुसरीकडे,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांना किती मते मिळतात, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.गेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराने लक्षणीय मते घेतली होती.यंदाही प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांना मिळणारी मते निकालाचे गणित बदलवू शकतात.त्यामुळे वंजारी आणि कोहळे यांच्यातील मताधिक्य किती राहणार, याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत.दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की,अभिजीत वंजारी यांची नागपूर शहरातील कामगिरी काहीशी कमजोर दिसली असली,तरी नागपूर ग्रामीणसह विभागातील उर्वरित जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला आहे.नागपूर शहरात पक्षातील अनेक नेत्यांची भूमिका या निवडणुकीत पक्षहिताची राहिलेली नाही.कुणाची नावे घेणे योग्य ठरणार नाही; मात्र काही नेते बऱ्याच उशिरा सक्रिय झाले,असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!