Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीनशामुक्त युवा विकसित भारत' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. - विजेत्या स्पर्धकांना...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “नशामुक्त युवा विकसित भारत” या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन येत्या ३० जुलै २०२६ रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचलित महिला महाविद्यालय,गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धांचे आयोजन महिला महाविद्यालय गडचिरोली, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि माय भारत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे तसेच कला,संस्कृती,साहित्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वाच्या माध्यमातून “नशामुक्त युवा विकसित भारत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात.स्पर्धांमध्ये लोकगीत,समूह नृत्य,पथनाट्य/मुक्तनाट्य,चित्रकला,वक्तृत्व,लघुपट/रील,घोषवाक्य लेखन तसेच स्लॅम पोएट्री(काव्य सादरीकरण)अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी २८ जुलै २०२६ पर्यंत MY Bharat Portal वर नोंदणी करून सहभाग निश्चित करावा.तसेच महाविद्यालयांनी आपल्या पात्र विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा,असे आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.योगेश पाटील,फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.प्रा. रूपेंद्रकुमार गौर तसेच माय भारत केंद्राचे अधिकारी सारंग मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!