Wednesday, June 10, 2026
Homeपुणेनदीवरील पुल कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू..

नदीवरील पुल कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे आज,रविवार १५ जून रोजी दुपारी इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडली.पूल कोसळल्याने तब्बल २५ पर्यटक थेट नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दोन जणांचा मृत्यू झाला.तर ३८ जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूड यांनी दिली आहे.तसेच,या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूड यांनी दिली.घटनेच्या वेळी ५० पेक्षा जास्त पर्यटक पुलावर होते.वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे.अश्यातच काही पर्यटक हे पुलाच्याखाली अडकून बसली होती.नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने  बचावकार्यास काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!