Thursday, April 30, 2026
Homeनागपूरनदीत उडी मारण्यापूर्वी मित्राला मॅसेज करून केली आत्महत्या..! - भंडारा व्यसनमुक्ती केंद्रात...

नदीत उडी मारण्यापूर्वी मित्राला मॅसेज करून केली आत्महत्या..! – भंडारा व्यसनमुक्ती केंद्रात होता बरेच दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वात जास्त तरुण वर्ग विष प्राशन करणे,गळफास घेणे व इतर आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.त्यामुळे तरुणांचे जीवन एवढे स्वस्त झाले की काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.केवळ टोकाचे पाऊल उचलणे हाच एकमेव उपाय नसून आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेऊन पुढील जीवनाचे सोने करणे आवश्यक आहे.तितकीच मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.अश्यातच नागपूर शहरातील गंगाबाई घाट परिसरातील मॅकेनिककडे दुचाकी दुरुस्तीची कामे करणाऱ्या एका ३२ वर्षीय राहुल रामदास मते रा.वीरशी धनी,ता.मौदा, जि.नागपूर या तरुणास दारूचे व्यसन जडले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचे दारूचे व्यसन सुटावे, यासाठी काही दिवस भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते.घरी परतून काही दिवस होत नाही, तो मंगळवारी पुन्हा दारू प्यायला.दारू पिण्याचे लक्षात येताच वडील रागावले.त्यातच तो काल बुधवारच्या दुपारी त्याच्या एमएच ३१-१८१६ क्रमांकाच्या दुचाकीने वीरशीहून कामठी तालुक्याच्या नेरी शिवारात गेला.त्याने कन्हान नदीवरील पुलावर दुचाकी उभी केली आणि मित्राला आपण आत्महत्या करीत असल्याचा मॅसेज व मोबाइल फोनचा पासवर्ड पाठविला.मॅसेज प्राप्त होताच मित्रासह कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यापूर्वीच त्याने मोबाइल फोन दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पुलावरून उडी घेत कन्हान नदीत आत्महत्या केली.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा मृतदेह सापडला नाही.मात्र,अंधार होईपर्यंत शोधकार्य सुरूच होते.३२ वर्षीय राहुल मते याने आत्महत्या कां केली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!