Monday, August 10, 2026
Homeकोल्हापूरनगर परिषदेचा अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात..

नगर परिषदेचा अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोल्हापूर :-नगर परिषदेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे एमबी रेकॉर्ड म्हणजेच मोजमाप पुस्तिका रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच घेतांना एका नगर परिषदेच्या नगर अभियंत्यास(स्थापत्य)एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.प्रदिप पांडुरंग देसाई वय ३२ वर्षे,पद-नगर अभियंता (स्थापत्य),नगरपरिषद मुरगुड,ता.कागल,जि.कोल्हापूर या ठिकाणी नेमणूक तर नगरपरिषद हुपरी,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर या ठिकाणी पूर्वी कार्यरत होते.सदरचा प्रकार हा हुपरी नगरपरिषदेत घडला.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः कंत्राटदार असून त्यांनी हुपरी नगरपरिषद अंतर्गत कामे पूर्ण केलेली आहेत.त्या कामाची एम.बी.रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात हुपरी नगरपरिषदेचे तत्कालीन नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी तक्रारदार यांचेकडून यापुर्वी ५० हजार रूपये घेतले होते.परत देसाई यांनी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र,तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो,कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.त्यानुसार,सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता देसाई यांनी यापुर्वी ५० हजार स्वीकारल्याचे मान्य करून राहीलेल्या ८० हजारातील पहिला हप्ता म्हणून ४० हजार रूपये लाचेची मागणी केली व उर्वरित ४० हजार रूपये एम.बी.रजिस्टर पूर्ण झाल्यावर घेण्याचे मान्य केले.सापळा कारवाई दरम्यान प्रदिप देसाई यांनी पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन ४० हजाराची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी प्रदिप देसाई विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे,अर्जुन भोसले अप्पर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांचे मार्गदर्शनानुसार,राजेंद्र सानप पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.कोल्हापूर पो.हे.कॉ.संदिप काशीद, पो.हे.कॉ.सुधिर पाटील, पो.कॉ.कृष्णा पाटील,चा.पो.कॉ.प्रशांत दावणे ॲन्टी करप्शन ब्युरो  कोल्हापूर यांनी केली आहे.
  • आवाहन👇
लाचेच्या अथवा अपसंपदेबाबतच्या तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१) महासंचालक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य मुंबई टोल फ्री क्रमांक :- १८००२२२०२१
२)पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र,पुणे दुरध्वनी कमांक- ०२०/२६१२२१३४,
०२०/२६१३२८०२, ०२०/२६०५०४२३.
३)श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील,पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर मो.नं. ९७६४१४०७७७. ९४०४३२१०६४ कार्यालय दुरध्वनी क्रमांक- ०२३१/२५४०९८९.
४) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकः- १०६४.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!