Thursday, September 3, 2026
Homeनागपूरधावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट; जीवितहानी टळली.. -वाहन पूर्णतः जळून खाक..

धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट; जीवितहानी टळली.. -वाहन पूर्णतः जळून खाक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका रुग्णाला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूरला नेत असतांना वाटेतच १०८ क्रमांकाच्या धावत्या रुग्णवाहिकेला अचानकपणे आग लागली.अश्यातच चालकाच्या सतर्कतेने रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर सुखरूप बचावले.मात्र, घडलेल्या घटनेत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची घटना काल,शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास उमरेड-भिवापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोंडबोरी फाटा परिसरात घडली.
माहितीनुसार,गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून अतुल लोणारेया या जखमी रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका क्रमांक-
एमएच १४ सी एल ०५१७ राष्ट्रीय महामार्गावरून
जात असतांना,गोंडबोरी शिवारात वाहनातून धूर निघतांना दिसला.चालक संघशील खुशाल उंदीरवाडे वय ३० वर्षे रा.येनापूर यांनी प्रसंगावधान राखत वाहन थांबवले आणि रुग्णवाहिकेत असलेल्या सर्वांना सुरक्षितरित्या खाली उतरवले.त्यानंतर रुग्णवाहिकेला काही अंतरावर घेऊन जात महामार्गाच्या कडेला उभी केली असता काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला आणि आगीचा डोंब उसळला.यानंतर उमरेड आणि भिवापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक संदीप सडमेक,आकाश महाकाळ, सुरेखा बिडकर आणि इतर पोलिस कर्मचारी तसेच रमेश येडे,किशोर डेकाटे,रवी वानखेडे,वासू समर्थ,सतीश राघोर्ते,अयुब पठाण यांनी शर्थीचे प्रयत्न करून मोठी दुर्घटना टाळली.मात्र,आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत रुग्णवाहिका पूर्णतः जाळून खाक झाली होती.आगीचे लोळ आणि धुरामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहनात असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरपैकी एकाचा स्फोट झाल्याने सदरची दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!