Sunday, June 28, 2026
Homeनांदेडधावत्या दुचाकीवर वीज कोसळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू..

धावत्या दुचाकीवर वीज कोसळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नांदेड :-जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आज,गुरुवारी १५ मे रोजी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचे कडकडाट व अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. अश्यातच दुपारच्या सुमारास पाऊस पडत असतांनाच आपल्या गावाकडे दुचाकीने जात असतांना अचानकपणे धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास माहूर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मालवाडा घाटात घडली.यात विदर्भातील हिवरा संगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पांडे वय ५६ वर्षे रा.करंजी,ता.माहूर, जि.नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, खिशातील मोबाईल फोन वाजला असता,फोन काढायसाठी गेले व तितक्यातच अंगावर विज कोसळली.पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करीत असते मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अश्या घटना घडत असतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!