उद्रेक न्युज वृत्त :-आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अशा दोन अभिकर्ता संस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते.धान खरेदी केंद्रे कधी सुरू केली जाणार याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून होते.त्यानुसार,२०२५-२६ या चालू वर्षातील खरीप हंगामातील धानाची आधारभूत दरानुसार विक्री करण्यासाठी धान खरेदी केंद्रांना शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली. खरेदी केंद्रांवर धान विक्री करण्याआधी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत वाढवून आता १५ डिसेंबर करण्यात आली आहे. शासनाच्या बिम पोर्टलवर ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच अधिकृत खरेदी केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांना धान विक्री करता येणार असल्याने शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी,असे शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
धान विक्री नोंदणीस मुदतवाढ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

