Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोली'धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान' पदभरती जाहिरातीचा आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी संबंध...

‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ पदभरती जाहिरातीचा आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी संबंध नाही- प्रकल्प अधिकारी रणजित यादव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ (DAJGUA) साठी प्रकाशित झालेल्या जाहिरातीचा शासकीय यंत्रणेशी कोणताही संबंध नाही,असे स्पष्टीकरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
विजय एस.बाहेकर अध्यक्ष,जन शिक्षण संस्थान, गडचिरोली यांच्यामार्फत २० ऑगस्ट २०२५ रोजीच्या ‘दैनिक लोकमत समाचार’ मध्ये ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र,ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किंवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेने प्रकाशित केलेली नाही. ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ हा कार्यक्रम शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबवला जातो.त्यामुळे या कार्यक्रमाच्या नावाचा वापर करून प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीचा कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!