- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.चक्क शिपायाकडून(नाइट वॉचमन)दोन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाची बाब उघड होताच शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपावरून आश्रमशाळेच्या नाइट वॉचमनला कोंढाळी पोलिसांनी अटक केली आहे.राजेश मुलचंद मालापुरे वय ४४ वर्षे,असे आरोपीचे नाव असून आरोपीविरोधात यापूर्वीही वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होता.मात्र,न्यायालयाच्या आदेशानंतर तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला होता.प्रकरण उघडकीस येताच नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक आश्रमशाळेत तळ ठोकून आहे.या पथकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मिसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण,प्रसन्नजीत गायकवाड,साधना ठोंबरे आणि मीनाक्षी धडाडे यांचा समावेश आहे.हे पथक आश्रमशाळेतील सर्व २६० विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून बयान नोंदवत आहेत.काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुमित परतेकी व पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके यांनी कारवाई करत आरोपी राजेश मुलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा(पोक्सो),बाल न्याय अधिनियम आणि अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.काटोल तालुक्याच्या कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थ्यावर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ ऑगस्टच्या रात्री साडे दहाच्या सुमारास लैंगिक शोषण करण्यात आला,तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाला. पीडित विद्यार्थ्यांनी याप्रकरणी आश्रमशाळेच्या अधीक्षकांकडे तक्रार केली.अधीक्षकांनी तातडीने कोंढाळी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवल्याने सदर प्रकार उजेडात आला.प्रकरणाचा पुढील तपास कोंढाळी पोलिस करत आहेत.
- Advertisement -

